मेलानीशिया
मेलानीशिया : पॅसिफिक महासागरातील ओशिॲनियांतर्गत द्वीपविभागांपैकी एक विभाग. क्षेत्रफळ सु. ५,७०,००० चौ. किमी., लोकसंख्या पापुआ न्यू गिनीसह ४०,००,००० (१९८१). नैर्ऋत्य पॅसिफिक महासागरात विषुववृत्ताच्या दक्षिणेस व ऑस्ट्रेलियाच्या ईशान्येस सु. ५,६०० किमी. पसरलेल्या या विभागात न्यू गिनी, न्यू कॅलेडोनिया, फिजी, लॉयल्टी, न्यू हेब्रिडीझ, सॉलोमन, सांताक्रू झ, ॲडमिरॅल्टी, लूईझीॲद, बिस्मार्क, डँट्रकास्टो इ. द्वीपसमूहांचा समावेश होत होता.